मुरूडहून
हार्णेकडे जाताना आसूद नाक्यापासून एक कि.मी. अंतरावर उजव्या
हाताला शेतामध्ये मंदिरात स्वयंभू, चतुर्भुज, उजव्या सोंडेच्या
गणेशाचे प्राचीन मंदिर आहे. एक-दीड फूट उंचीची कमलासनावर विराजमान
झालेली ही संगमरवरी मूर्ती पेशवेकालीन वाटते. मूर्तीच्या हातात
कमळ, परशु, मोदक आणि माळेसदृश वर्तुळाकार कोरलेले दिसतात. दर
संकष्टी चतुर्थीला येथे भाविकांची खूप गर्दी असते.
|