मुख्य रस्त्यावरून
मुरूड गावाकडे जाताना डावीकडच्या रस्त्याने आपण कर्दे या निसर्गरम्य
आणि सुरक्षित सागरकिनारी पोहोचतो. थंडीच्या मोसमात हर्णे, मुरूड,
कर्दे परिसरात स्थलांतरित पक्षी हजारोंच्या संख्येने येतात. पांढ-या
शुभ्र लाटा , आकाशात झेपावणारे हजारो पांढरे सीगल पक्षी तास न्
तास पाहत राहावे, असे वाटते. तेथून पावसाळा सोडून इतर मोसमात
बोटीने खोल समुद्रात जाऊन डॉल्फिन मासे पाहण्याची सागरी ससेफरही
करता येते.
|