माशांच्या
वाळवणाचा घमघमाट सुरू झाला की पाजपांढरी गाव आल्याचे लगेच लक्षात
येते. समुद्रकिना-यालगत रस्त्याच्या कडेला वसलेला हे गाव म्हणजे
एक मोठा कोळीवाडाच आहे. गावातील सर्व घरे कोळयांचीच आहेत. रस्त्याच्या
कडेला वाळत घातलेली मासे, खुंटीला लावलेली जाळी, लाटेवर डुलणा-या
होडया, डोक्यावर टोपली घेऊन जाण-या कोळिणी आणि मुक्तपणे बागडणारी
त्यांची मुले हे सगळं कुतूहल वाढविणारं आहे. पोहोचविणा-या सागरपुत्रांचे
कष्टमयी जीवन पाहण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी थोडा
वेळ द्यायला काय हरकत आहे.
|